Tag: Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे ऑनलाईन प्रश्नमंजुषा
पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे ऑनलाईन प्रश्नमंजुषा

पिंपरी, दि. १३ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. शिवरायांच्या संदर्भात असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे. दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ ते १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधी मध्ये ही प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न होणार आहे. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या शिवप्रेमींना ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे आपले जीवनमान उंचावले आहे. त्यातील एक भाग म्हणजे सोशल मिडीयाचा समाजावर निर्माण झालेला प्रभाव, याचा प्रकर्षाने विचार करावा लागेल. तरूणाई सोशल मिडीयाच्या आभासी जगात भरकटून जाताना दिसत आह...
…अन्यथा झी टॉकिजचे कार्यालय फोडू
पिंपरी चिंचवड, मनोरंजन

…अन्यथा झी टॉकिजचे कार्यालय फोडू

हर हर महादेव चित्रपट दाखविण्यावरून संभाजी ब्रिगेडचा इशारा लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी (दि. ४ डिसेंबर २०२२) : झी टॉकिजवर हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाविरोधात देशात, राज्यात शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन करत नापसंती व्यक्‍त केली आहे. तरीही झी टॉकिज या चॅनेलने हा चित्रपट दाखविल्यास त्यांच्या मुख्य कार्यालयावर आंदोलन छेडू. तरीही न ऐकल्यास कार्यालय फोडू, असा तीव्र इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांना दिलेल्या निवेदनात हा इशारा दिला आहे. सतिश काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हर हर महादेव चित्रपटामध्ये अनेक चुकीचे व वादग्रस्त संदर्भ दाखवित आले आहेत....
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे शिवचरित्राचे वाटप
पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे शिवचरित्राचे वाटप

थेरगाव : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. संभाजी ब्रिगेडने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही शिवरायांची जयंती पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेले शिवचरित्राचे तसेच गोविंद पानसरे लिखीत शिवाजी कोन होता या पुस्तकांसह अनेक पुरोगामी विचारांच्या पुस्तकांचे वाटप करून शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांच्या हस्ते इतिहासाच्या पानांवर रयतेचा मनांवर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे, महान राजे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवरायांच्या पुतळ्यासमोर आकर्षक रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शहर कार्याध्यक्ष संजय जाधव यांनी शिवरायांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याचे आवाहन केले. तसेच उपस...
शिवसेनेने कर्नाटक सरकारच्या एसटी बसेसवर भगव्या रंगाने “छत्रपती शिवाजी महाराज की जय” लिहून केल्या रवाना
पुणे, मोठी बातमी

शिवसेनेने कर्नाटक सरकारच्या एसटी बसेसवर भगव्या रंगाने “छत्रपती शिवाजी महाराज की जय” लिहून केल्या रवाना

पुणे शहर शिवसेनेतर्फे बंगळुरू येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध पुणे (प्रतिनिधी) : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराचे पडसाद राज्यभरात उमटण्यात येत असून पुण्यात देखील शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पुणे शहर शिवसेनेच्यावतीने कर्नाटकच्या अनेक बसेसना भगव्या रंगाने "छत्रपती शिवाजी महाराज की जय" लिहून व जयजयकार करून पुण्यातून कर्नाटकला राज्यात पाठवल्या आल्या. स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहासमोरिल खाजगी बस पार्किंगमध्ये उभ्या असणार्‍या कर्नाटक डेपोच्या अनेक एसटी बसेसला काळे फासत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. &n...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

पिंपरी : शुक्रवारी (दि. १७ डिसेंबर) कर्नाटकमधील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध करण्यासाठी, आज शनिवारी (दि १८ डिसेंबर) पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी व समविचारी संघटनांच्‍या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने, माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. याप्रसंगी बोलताना मारुती भापकर म्हणाले की "महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच कर्नाटक मधील जनतेने व सरकारांनी सतत महाराष्ट्राचा तिरस्कार केलेला आहे. या तिरस्काराचा एक भाग म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना, कर्नाटक मधील काही समाजकंटकांनी केलेली आहे. कर्नाटक मधील भाजपसरकारचाही या समाजकंटकांच्या कृत्याला पाठिंबा असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उ...
छत्रपती शिवरायांचा हिंदू धर्म…
विशेष लेख

छत्रपती शिवरायांचा हिंदू धर्म…

चंद्रकांत झटाले आजकाल जो तो उठतो आणि शिवरायांच्या नावाचा स्वतःच्या सोयीनुसार वापर करतो. नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी "छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली होती, त्यावर अलीकडच्या काळात अटलजी, अडवाणी आणि मोदींनी कळस चढवला" असे उद्गार काढून शिवरायांना हिंदुत्ववादी ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. छ. शिवराय हिंदुत्ववादी कधीही नव्हते. छ. शिवरायांची नीती- धोरणे, त्यांच्या आयुष्यातील घटनांद्वारे आपण शिवरायांचा हिंदू धर्म कोणता होता हे जाणून घेऊयात. आजवरचा इतिहास पाहता छत्रपती शिवरायांसारखा विज्ञानवादी आणि वास्तववादी दृष्टिकोन असणारा राजा भारताच्या इतिहासात दुसरा आढळून येत नाही. आपल्या देशात अनेक धार्मिक, शूर-वीर , पराक्रमी, मुत्सद्दी , राजे-महाराजे होऊन गेलेत परंतु छ .शिवरायांसारखा वास्तववादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कुणाक...