Tag: chief minister assistance fund

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 2 कोटी तर अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून 22 लाख 75 हजारांचा निधी
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 2 कोटी तर अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून 22 लाख 75 हजारांचा निधी

मुंबई (लोकमराठी): 'कोरोना' विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने 2 कोटी तर बँकेच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाच्यावतीने जमा केलेला 22 लाख 75 हजार रुपयांचा 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19' साठीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ग्रामविकास मंत्री तथा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयात सुपूर्द करण्यात आला. संपुर्ण जगावर आलेले कोरोना विषाणूचे संकट देशासह महाराष्ट्रावरही आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत. याचसाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री सहाय्यता निध...

Actions

Selected media actions