Tag: Congress

युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान 
पिंपरी चिंचवड

युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

पिंपरी, ०२ ऑक्टोबर २०२३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी व राष्ट्रीय स्वच्छता दिवसाचे औचित्य साधून काळेवाडी परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांचा युवक काँग्रेसतर्फे सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान खान, प्रदेश महासचिव प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव गौरव चौधरी, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, कुंदन कसबे, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, आरोग्य निरीक्षक वैभव केंचनगौडा व परिसरातील सफाई कर्मचारी उपस्थित होते. या वेळी युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान पत्र, शॉल व पुष्प देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उप...
किरीट सोमय्यांच्या जागी इतर पक्षाचा नेता असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता – सायली नढे 
पिंपरी चिंचवड, राजकारण

किरीट सोमय्यांच्या जागी इतर पक्षाचा नेता असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता – सायली नढे

पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमय्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन पिंपरी (लोकमराठी न्यूज) : किरीट सोमय्या यांच्या जागी इतर पक्षाचा कोणता नेता असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता. सोमय्या हे भाजपचे नेते असल्यामुळे त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झाली नाही. त्यामुळे आज आम्ही किरीट सोमय्या यांचा जोडे मारून निषेध करतो. असे म्हणत काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षा सायली किरण नढे यांनी भाजप सरकारवर टिकास्त्र सोडले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा नेटा डिसूजा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे व शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या आदेशाने महिला अध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये झालेल्या अमानवी महिला अत्याचाराच्या व किरीट सोमय्य...
महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल – काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे
पिंपरी चिंचवड

महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल – काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे

काळेवाडी : केंद्र सरकारने पेट्रोल-डीझेलच्या किमतीसह गॅस सिलेंडर व अन्नधान्यांचे भावही गगनाला भिडवले आहेत. तर शिक्षण गरीबांच्या आवाक्याबाहेर गेले असून महागाईने परिसीमा गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते तथा रॉयल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष रवि नांगरे यांनी येथे केले. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महागाईच्या विरोधात “हाहा:कार” जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्त पेट्रोल-डिझेल, सिलेंडर तसेच अन्नधान्यांचे भाव कमी व्हावे. यासाठी काळेवाडी परिसरात पदयात्रा घेऊन जनजागृती करण्यात आली. त्यावेळी रवि नांगरे यांनी आपल्या प्रखर भाषणात सर्वसामान्यांचा आवाज बनून त्यांच्या मागण्यांना वाचा फोडली. त्यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष व कामगार नेते डॉ. कैलास कदम, काँग्रेस पर्यावरण विभागाचे माजी प्रदे...
काँग्रेसची पहिली जाहिर सभा काळेवाडीत | काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांनी केले होते आयोजन
पिंपरी चिंचवड, राजकारण

काँग्रेसची पहिली जाहिर सभा काळेवाडीत | काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांनी केले होते आयोजन

स्थानिक समस्यांना फोडली वाचा काळेवाडी : आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग काँग्रेसने फुंकले असून काँग्रेसची पहिलीच जाहिर सभा काळेवाडीत झाली. या सभेचे आयोजन काँग्रेसचे युवा नेते व रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे यांनी केले होते. त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे व शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी विशेष हजेरी लावत, सभेला संबोधित केले. त्याप्रसंगी त्याप्रसंगी माजी प्रदेश अध्यक्ष पर्यावरण विभाग अशोक मोरे, अॅड. सोपान माने, माजी महापौर कवीचंद भाट, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, वालिया अल्पसंख्यांक प्रदेश सदस्य राजेंद्र सिंग, महिला नेत्या छाया देसले, सेवादलाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, एनएसयूआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माउली मलशेट्...

Actions

Selected media actions