जुन्रर परिसरात घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी
पुणे, दि ७ (लोकमराठी) - जुन्नर परिसरात दशक्रिया विधीसाठी घरातील लोक बाहेर गेल्याचा फायदा घेवुन घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करत ५ लाख ४६ हजार ४८१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
आकाश प्रकाश विभुते (वय ३२ वर्षे, सुपली, पो. पळशी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, सध्या रा. फुलसुंदर अपार्टमेंट, आनंदवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे या सरईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्हात वाढत्या घरफोडयाचे प्रमाण लक्षात घेवुन पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना घरफोड्यांबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे ...