धनंजय मुंडेंवर आता दुहेरी जबाबदारी! बीडसह ना. मुंडे आता परभणीचेही पालकमंत्री!
बीड जिल्ह्यासह परभणी जिल्ह्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार - धनंजय मुंडे
मुंबई (प्रतिनिधी) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणखी एक जबाबदारी दिली असून, त्यांना परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्त करण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना ही माहिती दिली होती, त्यानंतर आज या बाबतचा शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यभरात वक्तृत्व आणि कर्तृत्वातून वेगळा नावलौकिक प्रस्थापित केलेले नेते म्हणून धनंजय मुंडे यांची वेगळी ओळख आहे, त्याचबरोबर राज्यभरात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्याला लागून असलेल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे ना. मुंडेंकडे सोपवल्याने निश्चितच धनंजय मुंडे यांची ताक...