Tag: Dr. Akshay Mane

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अक्षय माने यांच्यातर्फे ५०० किलो तिळगूळ वाटप
पिंपरी चिंचवड

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अक्षय माने यांच्यातर्फे ५०० किलो तिळगूळ वाटप

काळेवाडी : नागरिकांशी असलेल्या सामाजिक व सलोख्याच्या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते व काळेवाडीतील विद्यादीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय गंगाराम माने यांनी प्रभाग क्रमांक २२ मध्ये सुमारे ५०० किलोग्रॅम तिळगूळ वाटप केले. मकरसंक्रांती निमित्त डॉ. माने यांनी राबवलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रभागातील विविध प्रश्नांवर मनसोक्त चर्चा केली. मकरसंक्रात या स्नेहवर्धक सणाचे आधुनिक अंग म्हणजे शुभेच्छापत्रांची देवाणघेवाण. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात कागदावरील शुभेच्छांची जागा सोशल मिडियाने घेतली असली तरी शाब्दिक शुभेच्छांसोबत तिळगुळ देणे आपुलकीच्या दृष्टीने गरजेचे आहे. या भावनेतून डॉ. अक्षय माने यांनी तिळगूळ वाटपाचा उपक्रम राबविला. या निमित्ताने प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना अनेक नागरिकांनी त्यांच्याशी प्रभागातील विविध प्रकारच्या समस्या व प्रभागा...

Actions

Selected media actions