Tag: Dr Pradnyawant Dewalekar

शाळकरी वयातली मुलं काय काय व्यसन करतात? अनेकांना सांगूनही पटणार नाही!
विशेष लेख

शाळकरी वयातली मुलं काय काय व्यसन करतात? अनेकांना सांगूनही पटणार नाही!

शहारुखच्या पोराचं सोडा हीच घटना त्याच्या करिअरसाठी लाॅंचपॅड ठरेल.. तुम्ही तुमच्या घरातल्या-आजूबाजूच्या मुलांशी यावर बोला आणि यावर त्यांची प्रतिक्रिया बघा.. ‘लिया माल, व्हाट्स दी बीग डिल? क्रुझपे वो क्या चाय पिने जायेंगा क्या?’ असं मध्यमवर्गीय घरातले आणि आर्यनपेक्षाही लहानं पोरं पटकन बोलतात किंवा फक्त सुचक हसतात.. हे सगळं “आपण नक्की कुठं चाललं आहोत?” असा प्रश्न नक्की निर्माण करतं. वाईट याचं वाटलं की ‘त्यानं’ व्यसन करणं म्हणजे फक्त ‘सरड्याची धाव शेवटी कुंपणापर्यंत’ ठरलं. इतकी सोपी व्याख्या मौजेची आणि नशेची? जी आहे बापाचा पैसा म्हणून विकत मिळते. अडकवला कॅमेरा गळ्यात-धुंडाळलं जंगल-शोधली खेकड्याची नवीन प्रजाती..याला म्हणतात ‘कैफ’ आर्यनची ‘बातमी’ झाली पण अगदी त्याच्याहून लहान शाळकरी मुलं कोणकोणत्या व्यसनात अडकली नाहीयेत हे विचारा. व्हाईटनर ही अगदी पहिली पायरी. माझ्या एका श...