श्री नगद नारायण, गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनलचा एकतर्फी विजय
बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
हाजीपुर, बीड (दि. 20 डिसेंबर) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज सर्वत्र जाहीर झाले. विजय उमेदवारांचे गुलाल, ढोल-ताशे आणि डीजेच्या आवाजामध्ये सर्वत्र आनंद उत्सव आणि जल्लोषात स्वागत होत आहे.
याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हाजीपुर गावची ग्रामपंचायत निवडणूक ही मोठ्या उत्साहात पार पडली. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आज पर्यंत गावची ग्रामपंचायत ही बिनविरोध म्हणून गणली जात होती. परंतु या पंचवार्षिक निवडणुकीला पहिल्यांदाच दोन पॅनल गावामध्ये पडले आणि प्रथमच निवडणूक गावामध्ये झाली. श्री नगद नारायण गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनल आणि श्री गोसावी बाबा ग्रामविकास पॅनल या दोन पॅनल मध्ये काट्याची टक्कर झाली. आणि यामध्ये श्री नगद नारायण गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनल चे सर्वच्या सर्व उमेदवार हे मोठ्या फरकाने नि...