Pimpri Chinchwad : ‘द पॅशन ऑफ ख्राईस्ट’ महानाट्यातून उलडणार येशू ख्रिस्ताचे दुखःसहन
‘फेथ ग्रुप'कडून विनाशुल्क सादरीकरण
पिंपरी : ‘गुड फ्रायडे’ सणाच्या पार्श्वभूमीवर फेथ ग्रुप च्यावतीने बायबलवर आधारित वधस्तंभवार खिळलेला येशूचा जीवन प्रवास ‘द पॅशन ऑफ ख्राईस्ट’ या मराठी महानाट्यातून दाखविण्यात येणार आहे. राखेच्या बुधवार (ता.५)पासून (ॲश वेनेस्डे) ख्रिस्ती बांधवांच्या चाळीस दिवसांच्या उपवास काळाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ख्रिस्ती बांधवांसाठी हे नाटक आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
चिंचवडमधील सेंट ॲन्ड्र्युज हायस्कुलच्या मैदानावर रविवारी (ता.९) सायंकाळी ६ वाजता सादर करण्यात येणार आहे. या महानाट्यात बायबलमधील अनेक धार्मिक प्रसंग कलाकारांनी जिवंत करणार आहे. ‘वधस्तंभावर खिळलेला येशू आणि पुर्नरूत्थानाच्या दिवशी शिष्यांना दर्शन' असा येशू ख्रिस्ताचा जीवन प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव समाज बांधवांना घेता येणार आहे. ‘वधस्तंभावरील मरण यातना सहन करूनही प्रभू येशूने शांतता, मानवता ...