Tag: Film city

चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा, राजस्थानहून मुलगा-मुलगी गायब | शोधण्यास मदत करण्याचे पालकाचे आवाहन
महाराष्ट्र, मोठी बातमी

चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा, राजस्थानहून मुलगा-मुलगी गायब | शोधण्यास मदत करण्याचे पालकाचे आवाहन

मुंबई : हरियाणातील मुलगा व त्याची फेसबुकवरील राजस्थानातील मैत्रीण दोघेही जानेवारी महिन्यापासून गायब आहेत. अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. मुलीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याने ते दोघेही मुंबईत असल्याची शक्यता आहे. या दोघांना शोधण्यास मदत करण्याचे पालकांनी आवाहन केले आहे. राजेश चुघ (रा. घर नंबर 512/ 21, गल्ली नंबर 1, नरेंद्रनगर, सोनीपत हरियाणा) यांचा मुलगा सौरभ चुघ (वय 18, उंची 5 फूट 11 इंच) हा घरातून 29 जानेवारी 2021 पासून गायब आहे. याप्रकरणी सोनीपत सिव्हिल लाईन पोलिसमध्ये फिर्याद दिली आहे. तर या मुलाची फेसबुकवर नंदिनी या एका मुलीशी मैत्री झाली. ती राजस्थानची राहणारी असून तीही त्याच दिवसापासून तिच्या घरातून गायब झाली आहे. नंदिनीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याचे तिच्या मेल्सवरून निश्चित होते आहे. ही दोन्ही मुले मुंबईत आहे असे समजते. सौरभचा मोबाईल नं...
अस्वस्थ रंगकर्मींचा ‘एल्गार’ | अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा
मोठी बातमी, मनोरंजन

अस्वस्थ रंगकर्मींचा ‘एल्गार’ | अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा

मुंबई (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : करोना महामारीची झळ आज सर्वांनाच बसली आहे. मनोरंजन क्षेत्र ही याला अपवाद नाही. गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगकर्मींचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने सर्व रंगकर्मी अस्वस्थ आहेत. आपल्या या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला असून शासन दरबारी आपल्या मागण्या ते सादर करणार आहेत. या आंदोलनाची दिशा कशी असेल? रंगकर्मीच्या नेमक्या मागण्या काय आहेत? यासाठी नुकत्याच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेते विजय पाटकर, विजय गोखले, दिग्दर्शक विजय राणे, संचित यादव, मेघा घाडगे, शीतल माने, चंद्रशेखर सांडवे, हरी पाटणकर, सुभाष जाधव, प्रमोद मोहिते आदि मान्यवर मंडळी तसेच संघटक व सहसंघटक यांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. यावेळी रंगकर्मींच्या मनातील अस्वस्थता व्यक्त झाली. व त्यांच्या मागण्...