एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती समारंभ संपन्न
हडपसर : रयत शिक्षण संस्था ही त्यागातून उभी राहिलेली संस्था आहे. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील हे कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. कर्मवीरांनी गोरगरीब व वंचित समुदायासाठी काम केले. कर्मवीरांनी महात्मा फुले यांचे सत्यशोधक समाजाचे कार्य केले. कर्मवीरांनी सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी वसतिगृह काढले. त्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी झाला. रयत ही एक वेगळी संस्कृती आहे. रयतेचे कार्यकर्ते ही कर्मवीरांच्या संस्कृतीमधून तयार झाले आहेत. रयत सेवक हे मनाने अतिशय निर्मळ आहेत. त्यांचा समाजावर उत्तम परिणाम होतो. महात्मा फुले यांचे माणूस घडविण्याचे कार्य कर्मवीरांनी केले. वंचितांसाठी काम करून, कर्मवीरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारूया. असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134 व्या जयंती समारंभ प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे, माजी सचिव, प्राचार्य डॉ. जनार्दन जाधव य...