प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारा
‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : वर्ष १६५९, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, याच दिवशी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेला राक्षसीवृत्तीच्या अफझलखानाला छत्रपती शिवरायांनी संपवला. हा दिवस ‘शिवप्रतापदिन’ साजरा केला जातो. जगातील सर्वांत महान १० युद्धाच्या घटनांपैकी एक मानली जाणारी ही घटना, विदेशांतील लष्कराला शिकवण्यात येते; मात्र दुर्दैवाने जेथे हा महापराक्रम झाला, तेथे या घटनेविषयी साधी माहिती देणारे एकही स्मारक नाही. यासाठी आज ‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या ठिकाणी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्ह...