Tag: hindu

कुजबुज : एक संशयात्मा
विशेष लेख

कुजबुज : एक संशयात्मा

जेट जगदीश गेल्या सहा वर्षांपासून देशात नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार आहे. ते आल्यापासूनचे अनेक विषय हे हिंदू आणि मुस्लिम अशी विभागणी करणारे आहेत. जसे की, गोहत्या आणि गोमासाच्या नावाखाली झुंडीने हत्या करणे, वंदे मातरम, भारतमाताकी जय म्हणायला बळजबरी करणे, अयोध्येत राम मंदिर उभारणे, काश्मीरचा वेगळा दर्जा रद्द करणे, इत्यादी…. अशी विषयांची यादी बरीच आहे. त्यात भरीस भर म्हणून काश्मिरी लोक मुसलमान आहेत त्यामुळे ते देशद्रोहीपणा करीत आहेत असे तर आजकाल आपले अनेक टीव्हीवाले आणि काही पेपरवालेही सूचित करत असतात. सर्वसामान्य हिंदू लोकांना मुस्लिम समाज, कुटुंबे यांची जवळपास काहीही माहिती नाही. त्यांचे राहणे-वागणे-बोलणे, खाणे-पिणे, भाषा, व्यवसाय, सण-समारंभ, धर्म, धार्मिकता याबाबत त्यांच्या डोळ्यापुढे वा कानावर कोणतेही दखलपात्र (authentic) तपशील येत नाहीत. त्यातल्या त्यात गर्दीमध्ये येता-जाता दिसणाऱ...

Actions

Selected media actions