Tag: Hinjewadi Police

ऑनलाईन बेटींग घेणारी “रेडी अण्णा” आंतरराज्यीय टोळी हिंजवडी पोलीसांनी केली जेरबंद
मोठी बातमी, पुणे

ऑनलाईन बेटींग घेणारी “रेडी अण्णा” आंतरराज्यीय टोळी हिंजवडी पोलीसांनी केली जेरबंद

चिंचवड : ऑनलाईन बेटींग घेणारी रेडी अण्णा नावाची आंतराज्यीय टोळी हिंजवडी पोलीसांच्या जाळ्यात सापडली आहे. या टोळीतील सात जणांना पोलीसांनी अटक करुन चार लाख २२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (ता. १६) पत्रकार परीषदेत याबाबत माहिती दिली. नारदमुनी नंदजी राम ( वय ३०, रा. शाहीदवीर नारायणसिंग नगर, खुर्शी पार्क, भिलाई, राज्य - छत्तीसगड), जयकुमार कंदन मेहता (वय १९, रा. सारसा, जि. जमुनीया, राज्य-बिहार), सतीश कृष्णा कन्सारी (वय २९, रा. मुळगाव, वार्ड.नं. ९, शंकरनगर दुर्ग, राज्य-छत्तीसगड), चिंटुकुमार रामस्वरुप गुप्ता (वय २९, रा. मुळगाव-मध्यपुरा, जि.लवालागाव, राज्य-बिहार), विक्रम महादेव काळे (वय २२, रा. मळगाव -मळवली, ता. माळशिरज, जि. सोलापूर), दिपक अशोककुमार सहा (वय २६, रा. गोड्डा, जि. भिमचक ग्राम, राज्य-झारखंड), हरिशकुमार जी बैरागी (वय २४, रा. बाला...