ऑनलाईन बेटींग घेणारी “रेडी अण्णा” आंतरराज्यीय टोळी हिंजवडी पोलीसांनी केली जेरबंद

ऑनलाईन बेटींग घेणारी “रेडी अण्णा” आंतरराज्यीय टोळी हिंजवडी पोलीसांनी केली जेरबंद

चिंचवड : ऑनलाईन बेटींग घेणारी रेडी अण्णा नावाची आंतराज्यीय टोळी हिंजवडी पोलीसांच्या जाळ्यात सापडली आहे. या टोळीतील सात जणांना पोलीसांनी अटक करुन चार लाख २२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (ता. १६) पत्रकार परीषदेत याबाबत माहिती दिली.

नारदमुनी नंदजी राम ( वय ३०, रा. शाहीदवीर नारायणसिंग नगर, खुर्शी पार्क, भिलाई, राज्य – छत्तीसगड), जयकुमार कंदन मेहता (वय १९, रा. सारसा, जि. जमुनीया, राज्य-बिहार), सतीश कृष्णा कन्सारी (वय २९, रा. मुळगाव, वार्ड.नं. ९, शंकरनगर दुर्ग, राज्य-छत्तीसगड), चिंटुकुमार रामस्वरुप गुप्ता (वय २९, रा. मुळगाव-मध्यपुरा, जि.लवालागाव, राज्य-बिहार), विक्रम महादेव काळे (वय २२, रा. मळगाव -मळवली, ता. माळशिरज, जि. सोलापूर), दिपक अशोककुमार सहा (वय २६, रा. गोड्डा, जि. भिमचक ग्राम, राज्य-झारखंड), हरिशकुमार जी बैरागी (वय २४, रा. बालाजीनगर, खुर्सीपार, भिलाई, राज्य-छत्तीसगड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हिंजवडीतील फेज-2 मधील हायमाउन्ट सोसायटी, फ्लॅट नं. 404 मध्ये ऑनलाईन बेटींग सुरु असल्याची माहिती हिंजवडी पोलीसांना मिळाली होती. मिऴालेल्या माहितीच्या आधारे हिंजवडी पोलीसांनी फ्लॅट वर छापा टाकुन 07 जणांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन 18 मोबाईल फोन, 02 लॅपटॉप, वायफाय राऊंडर, हिशोबाच्या वह्या मिळुन आल्या. तसेच त्या ठिकाणी 24 बाय 7 दिवसरात्र ऑनलाईन बेटींग चालु असल्याचे उघडकिस आले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नारद मुनी राम याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या मोबाईल फोन मध्ये आर18 नावाने बिझनेस अकांउंट असल्याचे दाखविले. तसेच त्या मोबाईल च्या डी पी करीता रेडी अण्णा व दोन मोबाईल नंबर नमुद असल्याचे देखील सांगितले. पोलीसांनी अधिक सखोल चौकशी केली असता त्याने एसआरबी डिपॉजिट(आर-18) नावाने असलेल्या अकाउंट दाखवुन वेगवेगळ्या इसमांकडुन प्राप्त झालेल्या रकमेचे स्रिनशॉटस् तसेच रेड्डी किंग, रेड्डी बुक व इतर वेगवेगळ्या वेबसाईट द्वारे पैसे ट्रान्सफर केले असल्याची माहिती दिली. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार छत्तीसगड मधील चंद्रकुमार रुपवानी हा असल्याचे निदर्शनास आले आहे.

ऑनलाईन बेटींगद्वारे करोडो रुपयांची करीत होते उलाढाल

आरोपी ऑनालाईन पद्धतीने वेगवेगळ्या अँप्लीकेशन द्वारे जुगाराचा अड्डा चालवित होते. टेलीग्राम व व्हॉटस् अँप च्या माध्यमातुन ते एकमेकांशी संवाद साधत होते. चौकशी दरम्यान वेगवेगऴ्या बॅकांच्या जुगार खेळणाऱ्या एकुण 10 खाती सिल करण्यात आली आहेत. खात्यात 02 लाख रुपये जमा झाल्यानंतर हे आरोपी ताबडतोब ती रक्कम वगवेगळ्या अकांउंट मध्ये वर्ग करीत होते. आता पर्यंत सुमार 1500 सट्टेखोरांनी या ऑनलाईन जुगारात सहभाग घेतला असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेली दोन महिन्यामध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली असल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. आरोपींनी आयपीएल क्रिकेट मॅचवर देखील बेटींग घेतली असल्याची कबुली दिली आहे.

सोसायटीच्या डोळ्यात धुळ

करोडो रुपयांचा ऑनलाईन जुगार खेळला जात असताना सोसायटी धारकांना या बाबतीत काहीच कल्पना नव्हती. आरोपींनी सोसायटी गेट वर असलेला मायगेट अँप मध्ये कोणतीही नोंद केली नाही. कोठे वाच्यता केली नाही. केवळ बेटींग करण्याच्या उद्देशाने आरोपींनी अशा प्रकारे गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचला असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे. मात्र, दिवस – रात्र येथे ऑनलाईन बेटींग सुरु होती.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दहीफळे, सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, पोलीस उप-निरीक्षक समाधान कदम, पोलीस उप-निरीक्षक यलमार, सहायक पोलीस उप-निरीक्षक बंडु मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, कुणाल शिंदे, अतिक शेख, रितेश कोळी, शिवराम भोपे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, झनकसिंग गुमलाडु, सुभाष गुरव, सागर घोगरे, सुतार यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.