PCMC : जिजामाता रुग्णालयाच्या डॉ. वैशाली यांचे तात्काळ निलंबन करा; जागृत नागरिक महासंघाची मागणी
पिंपरी (लोकमराठी न्यूज) : पहाटे 3:40 वाजता रुग्णालयात ऍडमिट होण्यासाठी गेलेल्या रुग्णाला रुग्णसेवा नाकारणाऱ्या व रुग्णहक्क सनदेचा अवमान करणाऱ्या जिजामाता रुग्णालयाच्या बेजबाबदार व उर्मट डॉक्टर वैशाली यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जागृत नागरिक महासंघाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात महासंघाच्या शिष्टमंडळाने डॉ. गोफणे यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव यांनी ज्या डॉक्टरांना रुग्णसेवा माहीत नाही तसेच रुग्णहक्क सनद माहित नाही, अशा डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये सेवेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. महापालिकेच्या उत्तम रुग्णसेवेच्या लौकिकास काळिमा फासणाऱ्या संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला मोठे आंदोलन उभे करावे लागेल असे खडसावून सांगितले.&nbs...