बकरी ईद निमित्त अंनिस कोल्हापूर व मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे रक्तदान शिबीर संपन्न
कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने बकरी ईद निमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले. धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये त्याग महत्वाचे मूल्य आहे. इस्लाम धर्मात ही इच्छा, ध्येय सिद्ध करण्यासाठी "कुर्बानी" किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. हा त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून "ईद - उल - अजहा" (बकरी ईद) हा सण इस्लाम धर्मीयांमध्ये साजरा केला जातो.
यानिमित्ताने बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्व धर्मियांनी आपले सण अधिकाधिक समाजाभिमुख आणि मानवतावादी करणे हेच धर्माचे उन्नयन आहे. हाच विचार समोर ठेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्यावतीने बकरी ईद निमित्त पशुची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये काळानुरूप बदल व्हावा व या प्रथेल...