Tag: #Letestnews

रिपब्लिकन पक्षाच्या  महाराष्ट्रातील कामगीरीकडे देशाचे लक्ष – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महाराष्ट्र

रिपब्लिकन पक्षाच्या  महाराष्ट्रातील कामगीरीकडे देशाचे लक्ष – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.२३. (लोकमराठी) - देशभरात रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढत आहे. ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाला राजकीय यश लाभत आहे. नुकत्यात झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडुन आले. देशभरात रिपब्लिकन पक्षाच्या नावाची चर्चा झाली. त्यामुळे  येणा-या मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष किती जागांवर विजय मिळवतो . आगामी काळेात महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष काय राजकिय कामगिरी करणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे  रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांत आपले उमेदवार निवडुन आणण्याची कामगिरी करून दाखवावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.  गोराई येथील हॉटेल बेव्हयु सभागृहात आमचे रामदास आठवले या गीताच्या  ध्वनीचित्रफितीचे ना.रामदास आठवले ...
मावळातील वेहेरगावात मूक पदयात्रेद्वारे छत्रपतींचे स्मरण.
पुणे

मावळातील वेहेरगावात मूक पदयात्रेद्वारे छत्रपतींचे स्मरण.

लोणावळा, दि.२२ (लोकमराठी) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ३३४ वा स्मृतीदिन धर्माप्रति बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त वेहेरगाव येथे विविध कार्यक्रम पार पडले. धर्मवीर बलिदान मास फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या आंग्ल दिनांक २१ फेब्रुवारी ते २१ मार्चया महिन्याच्या कालावधीमध्ये वेहेरगाव गावामध्ये शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने महिला व ग्रामस्थ सातत्याने माता भगिनी, धारकरी, लहान मुले- मुली यांनी रोज एकत्रित येऊन संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना दररोज श्रद्धांजली अर्पित केली. दि. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनी यांना रायगड दर्शन करून आणण्यात आले. या कालावधीमध्ये धर्मजागर करण्यासाठी संप्रदाय क्षेत्रातील,शिवचरिकार यांना आमंत्रित करून त्यांनी धर्मावर सुंदर असे मार्गदर्शन केले. यामध्ये सातत्याने महिनाभर वेह...
मोटार सायकल चोर जेरबंद, साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची आठवडयाभरातील दुसरी धडाकेबाज कारवाई
पुणे

मोटार सायकल चोर जेरबंद, साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची आठवडयाभरातील दुसरी धडाकेबाज कारवाई

पुणे, दि. १८ (लोकमराठी) - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (एसीबी) मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरास जेरबंद करण्यात आले आहे. यासह साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकाश महादु दुधवडे( वय -२३ वर्षे, रा.पोखरी, पवळदरा, ता. संगमनेर, जि.अहमदनगर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पुणे ग्रामीण मध्ये मागील वर्षभरात सायकल चोरींच्या प्रकरणात कमालीची वाढ दिसून आली. याबाबत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरीबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार ९ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत मोटार सायकल चोरावर मोठी कारवाई करत दहा लाख रूपये किंमतीच्या एक...