Tag: live today marathi news

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठी खुप महत्त्वाची बातमी 
महाराष्ट्र, मोठी बातमी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठी खुप महत्त्वाची बातमी

मुंबई, दि. १० विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड गाजली. लाडक्या बहिणींनी दिलेल्या भरभरून मतांमुळेच महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. अशातच आता निवडणुकांनंतर पुन्हा एकदा ही योजना चर्चेत आली आहे. राज्य सरकारकडून या योजनेत बदल होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या, याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वात महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये बदल करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. महिलांना त्यांचे पैसे मिळणार आहेत. अशी कोणतीही अट आम्ही घातलेली नाही. महिलांना त्यांचे पैसे मिळणारच आहेत. ही योजना राबवताना आम्ही अत्यंत योग्य पद्धतीने आणि विचार करून राबवत आहोत. त्यामुळे जे पैसे आम्ही द्यायचे ठरवले आहेत ते देणारच, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट के...