Tag: Loksabha 2019

भाजपचा पराभव अटळच आहे : पहा कसा?
सिटिझन जर्नालिस्ट

भाजपचा पराभव अटळच आहे : पहा कसा?

लोकसभा जरी ३६ राज्यातील ५४४ सदस्यांनी बनत असली तरीही त्यातील १३ राज्येच संख्यात्मकतेने प्रभावी ठरतात. या १३ राज्यातच तब्बल ८१ % म्हणजे ४४० खासदार आहेत. सत्ता संपादनासाठी लागणारा २७२ हा जादुई आकडा देखील या १३ राज्यातील निम्म्या जागा जिंकल्या तरी गाठायला सोपा जातो. थोडक्यात, या १३ राज्यातून मागच्या वेळी भाजपला काय मिळाले व आता काय मिळणार ते पाहिले तर भाजपचा पराभव स्पष्ट होतो. आधी राज्यवार एकूण जागा पाहू : (१) उत्तरप्रदेश ८० (२) महाराष्ट्र ४८ (३) बंगाल ४२ (४) बिहार ४० (५) तमिळनाडू ३९ (६) मध्यप्रदेश २९ (७) कर्नाटक २८ (८) गुजरात २६ (९) राजस्थान २५ (१०) आंध्र २५ (११) ओडिशा २१ (१२) केरळ २० (१३) तेलंगणा १७. आता भाजपची या राज्यातील मागच्या वेळची कामगिरी पाहू : केरळ व तमिळनाडू या राज्यात भाजपला भोपळा फोडता आला नव्हता. बंगाल, आंध्रमध्ये प्रत्येकी दोन तर तेलंगणा व ओडिशात प्रत्येकी एका ...
मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक
मोठी बातमी

मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक

रायगड : कामोठे येथे मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुध्द सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी गुन्हा दाखल केला आहे. भरारी पथक क्रमांक २ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. हीी कारवाई शनिवारी (दि. २७) सायंकाळी करण्यात आली. संदीप रामकृष्ण पराडकर (वय 31, रा. रूद्रराज बिल्डींग, कामोठे) आणि वैभव विठोबा पाटील (वय 34, रा. कामोठे गाव, ता. पनवेल, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ११ हजार ९०० रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह, फोटो व नावे असलेली यादी सापडली. चरणदीपसिंग बलदेव सिंग, विकास नारायण घरात (नगरसेवक पनवेल...
थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा
पिंपरी चिंचवड, राजकारण

थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांना थेरगाव मधील बारणे कुटुंबीयांनी पाठिंबा दिला आहे. पार्थ पवार हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी पार्थ पवार हे थेरगाव येथे प्रचारासाठी गेले असताना त्यांना बारणे कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. थेरगाव मधील निलेश बारणे, प्रशांत बारणे, काळूराम बारणे, संभाजी बारणे, जयसिंग बारणे, शंकर बारणे यांच्यासह संपूर्ण थेरगाव मधील बारणे परिवाराने पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावेळी बोलताना संभाजी बारणे म्हणाले की, मागील पाच वर्षात श्रीरंग बारणे यांनी कोणत्याही प्रकारची कामे या भागात केली नाही. खासदार म्हणून कोणताही निधी थेरगाव भागाला देण्यात आला नाही. थेरगाव मध्ये अनेक प्रश्न आहेत मात्र कोणतेच प्रश्न सोडविण्यासाठी त्या...