Tag: #maharashtra

मोठी बातमी : प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची गरज नाही
पुणे

मोठी बातमी : प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची गरज नाही

पुणे : राज्य शासनाने नुकताच प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र अथवा अन्य प्रकाराचे डॉक्युमेंट शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरऐवजी पाचशे रुपयांचे स्टॅम्प वापरण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी महा ई-सेवा केंद्रातून नागरिकांकडून ५०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र मागितले जात असल्याच्या तक्रारी नोंदणी विभागाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र, उत्पन्नप्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपपत्र, आदी विविध दाखल्यांसाठी, तसेच शासकीय कामकाजासाठी लागणाऱ्या स्टॅम्पपेपरची माफी कायम ठेवण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण नोंदणी व मुद्रांक विभागाने दिले आहे. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून, त्यामध्ये विविध प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी, तसेच घोषणापत्रांसाठी स्टॅम्पपेपरची आवश्यकता नसल्याचे म्हटले आ...