Tag: Marathi Language

मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे – डॉ. शिवलिंग मेनकुदळे
शैक्षणिक

मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे – डॉ. शिवलिंग मेनकुदळे

हडपसर (प्रतिनिधी) : मराठी भाषेला लोकसंस्कृती व लोक व्यवहाराचे कवच आहे, तोपर्यंत कोणताही धोका नाही. मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे. ती लोक व्यवहाराबरोबर साहित्य व्यवहारातही असावी. कुसुमाग्रजांचे व्यक्तिमत्व प्रतिभासंपन्न होते. त्यांच्या साहित्यातील वैचारिकता समाजाला दिशा देणारी आहे. भाषा हा मानवी जगण्याचा श्वास आहे. त्यामुळेच आपल्या जीवनात गतिमानता आली आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. मराठी शाळा बंद पडत आहेत, ही धोक्याची सूचना आहे. इतर भाषा शिकूया पण आपण आपल्या मराठी भाषेचा गौरव केला पाहिजे. लेखकांनी लेखन करून मराठी भाषा समृद्ध केली आहे. आपणही मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करुया, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन समारंभ प्रसंगी प्...