Tag: Marathi News

युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा पुणे ग्रामीण प्रभारीपदी चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती
पिंपरी चिंचवड

युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा पुणे ग्रामीण प्रभारीपदी चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती

पिंपरी (प्रतिनिधी) , ५ नोव्हेंबर २०२३ - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांची प्रदेश सचिव पदी निवड करत पुणे ग्रामीण विभागाच्या प्रभारी पदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल घेत प्रदेश कार्यकारिणीने चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू, सहप्रभारी एहसान खान, सहप्रभारी कुमार रोहित आणि प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हे आणि विभागाच्या प्रभारींची यादी जाहीर केली. चंद्रशेखर जाधव हे काँग्रेस पक्षाचा तरुण निष्ठावंत चेहरा म्हणून राजकीय क्षेत्रात परिचित आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जाधव यांनी काँग्रेस पक्षाशी नाळ बांधल...
चिंचवडगावातील प्रबुद्ध संघात वर्ष वास प्रवचन मालिकेची समाप्ती
सामाजिक

चिंचवडगावातील प्रबुद्ध संघात वर्ष वास प्रवचन मालिकेची समाप्ती

चिंचवड, ता. ३१ : भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तीन महिन्यांपासून आयोजित केलेल्या वर्ष वास प्रवचन मालिकेची समाप्ती आश्विन पौर्णिमेला झाली. ही प्रवचन मालिका प्रबुद्ध संघ चिंचवडगाव येथे राबविण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे शहर महासचिव अशोक सरपाते, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आयुष्यमान एस. एल. वानखेडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास जगताप उपस्थित होते. उल्हास जगताप यांच्या हस्ते १० वी १२ उत्तीर्ण मुलांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बौद्धांची विश्व विद्यापीठे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रबुद्ध संघाचे सचिव निशांत कांबळे, उपाध्यक्ष अल्पणा गोडबोले, खजिनदार आयुष्यमती अनुराधा सोनवणे, भारतीय बौद्ध महासभा वार्ड अध्यक्ष किशन बलखंडे, पदाधिकारी किशोर सोनवणे, डॉ. धर्मेंद्र रामटेके, प्रतिमा साळवी,...
PCMC : जिजामाता रुग्णालयाच्या डॉ. वैशाली यांचे तात्काळ निलंबन करा; जागृत नागरिक महासंघाची मागणी
पिंपरी चिंचवड

PCMC : जिजामाता रुग्णालयाच्या डॉ. वैशाली यांचे तात्काळ निलंबन करा; जागृत नागरिक महासंघाची मागणी

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : पहाटे 3:40 वाजता रुग्णालयात ऍडमिट होण्यासाठी गेलेल्या रुग्णाला रुग्णसेवा नाकारणाऱ्या व रुग्णहक्क सनदेचा अवमान करणाऱ्या जिजामाता रुग्णालयाच्या बेजबाबदार व उर्मट डॉक्टर वैशाली यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जागृत नागरिक महासंघाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाच्या शिष्टमंडळाने डॉ. गोफणे यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव यांनी ज्या डॉक्टरांना रुग्णसेवा माहीत नाही तसेच रुग्णहक्क सनद माहित नाही, अशा डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये सेवेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. महापालिकेच्या उत्तम रुग्णसेवेच्या लौकिकास काळिमा फासणाऱ्या संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला मोठे आंदोलन उभे करावे लागेल असे खडसावून सांगितले.&nbs...
नवरात्रीनिमित्त ‘नऊ दिवस, नऊ सन्मान’ अंतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

नवरात्रीनिमित्त ‘नऊ दिवस, नऊ सन्मान’ अंतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने 'नऊ दिवस, नऊ सन्मान' या उपक्रमांतर्गत शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत युवक काँग्रेसच्या वतीने कु. संस्कृती गोडसे (सामाजिक क्षेत्र), कु. अंकिता नगरकर (वैज्ञानिक क्षेत्र), कु. खुशी मुल्ला (क्रीडा क्षेत्र), मोनिका गोळे-पेंढारकर (लोककला क्षेत्र), अमृता ओंबळे (कला क्षेत्र), प्राजक्ता रुद्रवार (शैक्षणिक क्षेत्र), डॉ. जागृती चव्हाण (वैद्यकीय क्षेत्र) आणि रेनी सजी (उद्योजक क्षेत्र) या रणरागिनींना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजकांच्या वतीने सत्कारमूर्तींना गौरवपत्र देण्...
PCMC : काळेवाडीत बस थांब्याअभावी प्रवाशांचे हाल
पिंपरी चिंचवड

PCMC : काळेवाडीत बस थांब्याअभावी प्रवाशांचे हाल

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : काळेवाडी मुख्य रस्त्यावरील बस थांब्यांना शेड नाही. त्यामुळे उन, वारा, पावसात प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते. वर्षानुवर्षे होत असलेली प्रवाशांची गैरसोय पहाता, तातडीने काळेवाडीत बंसथांबे शेडे उभारावेत. अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. काळेवाडीत परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे येथून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच प्रवाशांमध्ये महिला, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांचीही प्रमाण जास्त आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी बसथांबा शेडची गरज आहे, त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्टीलचे शेड न उभारता भलत्याच ठिकाणी ते उभारले आहे. काळेवाडी दवाखान्यासमोर असेच शेड आहे. विशेष असे शेड शहरात अगदी गल्लीत पहायला मिळतात. शेड नसलेले दोन्ही बाजूचे बसथांबे - बी. टी. मेमोरियल शाळेसमोर ...
गंगाराम मुरकुटे यांचे दुःखद निधन 
पिंपरी चिंचवड

गंगाराम मुरकुटे यांचे दुःखद निधन

काळेवाडी : येथील ज्येष्ठ नागरिक गंगाराम दारकू मुरकुटे (वय ७५, रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबानगर) यांचे शुक्रवारी (ता. १३) आकस्मित निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे, परतुंड असा परिवार आहे. ते संरक्षण खात्याच्या पिंपरीतील डेअरी फार्म विभागातून निवृत्त झाले होते. अनिल मुरकुटे, सुनिल मुरकुटे व नितेश मुरकुटे यांचे ते वडील होत. ...
युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान 
पिंपरी चिंचवड

युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

पिंपरी, ०२ ऑक्टोबर २०२३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी व राष्ट्रीय स्वच्छता दिवसाचे औचित्य साधून काळेवाडी परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांचा युवक काँग्रेसतर्फे सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान खान, प्रदेश महासचिव प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव गौरव चौधरी, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, कुंदन कसबे, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, आरोग्य निरीक्षक वैभव केंचनगौडा व परिसरातील सफाई कर्मचारी उपस्थित होते. या वेळी युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान पत्र, शॉल व पुष्प देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उप...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत वर्षा कदम प्रथम
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत वर्षा कदम प्रथम

शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन प्रतिनिधी, २४ सप्टेंबर २०२३ : पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत आकुर्डी येथील वर्षा कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा, यासाठी गणेशोत्सवाचे औचित्य साधत शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या वर्षा कदम यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अप्रतिम थीम उभारले होते. त्याचबरोबर काळेवाडी येथील पूनम गोरे यांनी स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक पटकावले. त्यांनी नुकताच महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असलेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या थीमवर सजावट केली होती. स्पर्धेचे तिसरे बक्षीस रहाटणी येथील गीतांजली कुंभार पटकावले. या तिघांनाही आयोजकांच्या वतीने रोख...
Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना 
सिटिझन जर्नालिस्ट

Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना

पिंपळे गुरव (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणरायाचे आगमन शिवमुद्रा रथामधून पारंपारिक वाद्यांच्या गजरात झाले. छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा परिधान करून लहान मुले, महिला, पुरुष यावेळी सहभागी झाले होते. मंडळाचे हे ५१ वर्षे असून औंध येथील चंद्रकांत कदम ढोल-ताशा लेझीम पथकाच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात काढलेल्या मिरवणूकी वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मंडळाने या वर्षी ' जागर देवीचा ' हा आकर्षक देखावा सादर केला आहे. तसेच यावर्षी मंडळाने अनाथ आश्रमाला मदत करण्यासाठी एक हात मदतीचा हा उपक्रम राबविला असून अनाथ आश्रमातील मुलांना आरतीचा मान दिला जाणार आहे. त्याचबरोबर अन्नदान केले जाणार आहे. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाणार असून रक्तदात्यास छोटेसे गिफ्ट देणार येणार आहे. असी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रतीक मोरे, उपाध्यक्ष्य गणेश कुंभार, कार्याध्...
PM VISHWAKARMA YOJANA : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळवायचे? जाणून घ्या
विशेष लेख

PM VISHWAKARMA YOJANA : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळवायचे? जाणून घ्या

लोकमराठी न्यूज नेटवर्क : विश्वकर्मा योजनेला १७ सप्टेंबर सुरुवात झाली आहे. पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने १६ ऑगस्ट २०२३ रोजी मंजुरी दिली असून योजनेसाठी १३,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना २०२३-२०२४ ते या पाच वर्षांसाठी असेल. या योजनेचा उद्देश काय आहे? या योजनेसंबंधी असं म्हटलं जातंय की, गुरु-शिष्य परंपरेला चालना देणे आणि कारागिरांच्या कौटुंबिक-आधारित पारंपारिक व्यवसायाला बळ मिळेल हा यामागचा उद्देश आहे. शिवाय कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारणे. तसेच या कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक विक्री साखळीशी जोडणे ही या योजनेची इतर उद्दिष्टे आहेत. या योजनेअंतर्गत लोकांना काय मिळणार? पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि हस्तकला कामगारांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळेल. तसे...