HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘भारतातील संशोधनाच्या संधी’ विषयावर कार्यशाळा संपन्न
हडपसर | प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील लक्ष्मीबाई भावराव पाटील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन (CIII) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील संशोधनाच्या संधी या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विवेक पवार (सीईओ, पुणे) उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळावे. डॉ. अशोक नगरकर(डी.आर.डी.ओ. एच.ई.एम.आर.एल. पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ) उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पेटंट रजिस्टर करताना तत्काळ रजिस्टर केली पाहिजे. घेतली पाहिजे. फाईल कशी करायची यासंदर्भात माहिती दिली. तसेच कॉपीराईट संदर्भात माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शि...










