युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा पुणे ग्रामीण प्रभारीपदी चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती
पिंपरी (प्रतिनिधी) , ५ नोव्हेंबर २०२३ - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांची प्रदेश सचिव पदी निवड करत पुणे ग्रामीण विभागाच्या प्रभारी पदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल घेत प्रदेश कार्यकारिणीने चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू, सहप्रभारी एहसान खान, सहप्रभारी कुमार रोहित आणि प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हे आणि विभागाच्या प्रभारींची यादी जाहीर केली.
चंद्रशेखर जाधव हे काँग्रेस पक्षाचा तरुण निष्ठावंत चेहरा म्हणून राजकीय क्षेत्रात परिचित आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जाधव यांनी काँग्रेस पक्षाशी नाळ बांधल...