तीन लाख लाडक्या ‘बहिणी’ राहिल्या वंचित
'लाडकी बहीण' योजनेसाठी पुणे शहर जिल्ह्यात १९ लाखांपेक्षा अधिक अर्ज
पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी'साठी पुणे शहर (Pune City) जिल्ह्यातून सुमारे १९ लाख २९ हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी १७ लाख ७५ हजारपेक्षा अधिक अर्जाना मान्यता देण्यात आली असून, आधार क्रमांक बँकेशी संलग्न न केल्याने सुमारे तीन लाख २३ हजारपेक्षा अधिक लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही.
लाडकी बहिणीसाठी (Ladaki Bahin) पुणे शहर जिल्ह्यातून जुन्या योजनादूत (YOJANA Doot) अॅपवरून नऊ लाख ७५ हजार सहा अर्ज दाखल करण्यात आले होते. नवीन पोर्टलवरून एकूण नऊ लाख ५४ हजार ४९७ इतके अर्ज दाखल केले होते. त्यामुळे शहर जिल्ह्यातून आजमितीला १९ लाख २९ हजार ५०३ इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी १८ लाख ७८ हजार ६५१ इतक्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून चार हजार ७६५ इत...