Tag: nagpur

नागपूरच्या किट्टुबिटुब्लॉगर्सनी फूड ब्लॉगिंगमध्ये रचला विश्वविक्रम
खवय्ये

नागपूरच्या किट्टुबिटुब्लॉगर्सनी फूड ब्लॉगिंगमध्ये रचला विश्वविक्रम

नागपुर (लोकमराठी न्यूज) : किट्टूबिट्टूवीलॉगर्स (kittubittuvloggers) ला अलीकडेच "इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड्स" ने भारतातील सर्वात तरुण फूड व्लॉगर्स म्हणून सन्मानित केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. किट्टूबिट्टूवीलॉगर्स ना देखील अलीकडेच 94.3 MYFM रेडिओ चॅनलवर मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. जेथे त्यांनी वाहतूक नियंत्रण नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एका मोठ्या उपक्रमात भाग घेतला होता. "तुम्ही तरुण आणि प्रतिभावान असाल, तर तुम्हाला पंख असल्यासारखे वाटते" असे म्हणतात. आशिष आणि श्रीमती भावना यांच्या पोटी जन्मलेल्या नक्ष (८ वर्षे) आणि सिद्धार्थ धिंग (६ वर्षे) या दोन मास्टरमाइंड भाऊंच्या कामातही हेच सिद्ध झाले आहे. किट्टूबिट्टूवीलॉगर्स हे देशातील सर्वात तरुण व्यावसायिक व्लॉगर्स आहेत. ज्यांनी विविध खाद्य...
#coronavirus : कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!
मोठी बातमी, महाराष्ट्र

#coronavirus : कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!

लोकमराठी : कोरोना (covid-19) या आजारावर योग्य उपचार व मनाची सकारात्मकता असेल तर त्यावर विजय मिळविणे कठिण नाही. असे मत एका कोरोनावर मात केलेल्या रूग्णाने व्यक्त केले आहे. या रूग्णाने आपला अनुभव सांगताना म्हटले आहे की, माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी 3 सहकाऱ्यांना कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह आली. हे ऐकून मी घरीच स्वत:ला क्वारंटाईन केलं. आणि नंतर माझ्या सेाबत आलेल्या मित्रांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी गेलो. मला असिम्टोटिक कोरोना झाल्याचं निदान झालं. म्हणजे कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणं मला नव्हती. तरी मला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. कोरोना असल्याचं कळलं. त्यामध्ये मला मल्टीविटामीनच्या गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दे...