धक्कादायक : नाशिक पंचवटीत पुजारी एकमेकांना भिडले, एकाने दुसऱ्यावर पिस्तूल रोखली
त्रंबकेश्वरमध्ये विविध पूजेवरुन पुन्हा पुरोहितांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
नाशिक : नाशिकच्या पंचवटी (Panchavati) येथे पुराणकाळातलं मंदिर आहे. तिथे कुंभमेळा (Kumbhmela) भरवतो. दररोज हजारो पर्यटक पंचवटीला भेट देतात. पण लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या याच पंचवटीत एक विचित्र घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पंचवटी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहित किंवा पुजाऱ्यांचं वास्तव असतं. भाविक त्यांना वंदन करुन त्यांचे आशीर्वाद घेतात. त्यांच्या सुचनेनुसार विविध पुजा-आस्था करतात. पण पंचवटी इथे घडलेल्या घटनेमुळे भाविकांचं मन दुखावलं आहे. कारण पंचवटीत पुजारींच्या (Pujari) दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी (Dispute) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या गदारोळादरम्यान एका पुजाऱ्याने थेट पिस्तूल (Pistule) बाहेर काढल्याचीदेखील माहिती समोर आली...