Tag: PCMC Election

युवा नेतृत्वाला संधी देण्याबाबत रहाटणीकरांचे एकमत
पिंपरी चिंचवड, राजकारण

युवा नेतृत्वाला संधी देण्याबाबत रहाटणीकरांचे एकमत

पिंपरी : सामाजिक कार्यकर्ते व निर्भया महिला मंचचे संस्थापक अध्यक्ष उल्हास कोकणे हे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३३ मधून इच्छुक आहेत. त्यानिमित्त नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी जगताप डेअरीमधील पखवान हॉटेल येथे मंगळवारी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उल्हास कोकणे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संधी देण्याबाबत रहाटणीकरांचे एकमत झाले. त्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक, उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह विविध सामाजिक मंडळाचे व लायन्स क्लबचे पदाधिकारी, रहिवासी सोसायटीतील नागरिक व समस्त रहाटणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना उल्हास कोकणे म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे पद माझ्याकडे नसताना विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. नागरिक व विशेष कर...
पिंपरी चिंचवड भाजपाचे ‘मिशन १००+’; शहराध्यक्ष महेश लांडगेंनी ‘शड्डू ठोकला’
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी चिंचवड भाजपाचे ‘मिशन १००+’; शहराध्यक्ष महेश लांडगेंनी ‘शड्डू ठोकला’

शहरात 'बूथ सक्षमीकरण' अभियान; कार्यकर्त्यांच्या 'डोअर टू डोअर' भेटी-गाठी! मोहननगरमधील भाजपाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये शहर भाजपाकडून मोर्चेबांधणीला सुरवात झाली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मिशन १००+' हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तयारीचा 'शड्डू ठोकला' आहे. शहर भाजपातर्फे शनिवारपासून (दि.१७) पक्षाच्या 'बुथ सक्षमीकरण' अभियानाला सुरवात करण्यात आली. मोहननगर येथील प्रभाग क्रमांक १४ पासून स्वतः भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी जुने-जाणते कार्यकर्ते तसेच बूथ प्रमुखांच्या 'डोअर टू डोअर' भेटीगाठी घेऊन चर्चा केली. शहर भाजपाचा हा 'बूथ सक्षमीकरण' पॅटर्न कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. ...