Tag: Pimprgaon

रक्षाबंधन….असेही!
सिटिझन जर्नालिस्ट

रक्षाबंधन….असेही!

संतोष गोलांडे पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज मंदिराचे काम सुरु आहे. काही महिन्यांपासून या कामावरील कामगार हे काम करीत आहेत. अनेक दिवस घरापासून दूर आलेले आहेत. घरापासून दूर आल्यामुळे सर्व सण समारंभाना ते मुकलेले आहेत. आज श्रावणी पौर्णिमा..रक्षाबंधन चा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा विशेष दिवस. आमचे मित्र प्राध्यापक श्री. विद्यासागर अप्पासाहेब वाघेरे हे रोज नवीन मंदिराच्या कामावर भेट देऊन पाहणी करीत असतात. परंतु आज ते त्यांची कन्या कु. चित्कला हिला घेऊन मंदिराच्या कामाच्या ठिकाणी गेले. कु. चित्कला हिने मंदिराच्या कामावरील सर्व कामगारांना ओवाळले. नाथसाहेबांच्या मंदिरासाठी झटणाऱ्या हातांवार राखी बांधली. प्रा. विद्यासागर वाघेरे यांनी स्वतः सर्व कामगारांना मिठाई देऊन तोंडं गोड केले. या सर्व प्रसंगाने भारावलेल्या श्रमिकांच्या डोळ्यात अश्रू न आले तर नवलंच! भरलेल्या डोळ्यांनी...