Tag: Purandar Vidyapith

गुन्हे दाखल होऊनही पोलिस व आमदारांच्या आशीर्वादाने चालतेय बोगस पुरंदर विद्यापीठ?
पुणे, मोठी बातमी

गुन्हे दाखल होऊनही पोलिस व आमदारांच्या आशीर्वादाने चालतेय बोगस पुरंदर विद्यापीठ?

मानवता हितायचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी यांनी उघड केला घोटाळा लोकमराठी न्यूज नेटवर्क पुणे : राज्याची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सरकारी अधिकाऱ्यांची निष्क्रियता याला कारणीभूत आहे, तसेच राज्यातील मंत्रीच बोगस विद्यापीठाचे विद्यार्थी असतील तर जनतेने न्याय कोणाकडे मागावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असा संताप मानवता हितायचे अध्यक्ष धनराज चौधरी यांनी व्यक्त करत पुणे पोलीस अधीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. याबाबत धनराज चौधरी यांनी सांगितले की, “पुरंदर विद्यापीठातून” हजारो विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पदव्या विकत घेतल्या आणि या पदव्यांचा वापर करून खासगी व सरकारी नोकरी देखील मिळवली. काहींनी या पदवीचा वापर करून पालिकेत प्रमोशन देखील घेतले, मात्र त्यात होरपळ झाली ती सामान्य विद्यार्थ्याची. आज सामान्य विद्यार्थी कॉलेजच्या फि भरून, आठ-आठ तास शिकवणी करून, ...