सहायक आयुक्त राजाराम पाटील यांच्या बदलीने..गहिवरले पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय!
पिंपरी : शासकिय कर्मचारी यांची बदली होणे हे क्रमप्राप्त असते. कामाचा तो एक भाग असतो. मात्र .. काही शासकिय अधिकारी असे असतात की, त्यांची इतरत्र बदली होणे, हि गोष्ट मनाला पटणे. तेथील त्यांचे सहकारी तसेच संपर्कात आलेली मंडळी यांना काही काळासाठी तरी कठीण होऊन जाते. असेच काहीसं .. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त राजाराम (तात्या) पाटील यांच्या बाबतीत पाहावयास मिळत आहे. सहायक पोलीस आयुक्त पाटील यांची बदली कोल्हापूर या ठिकाणी झाल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहकारी यांना अक्षरशः गहिवरुन आले असल्याचे चित्र आहे..
पोलीस म्हटलं की, सर्वसामान्यांच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. करडी नजर, आवाजातील कणखरपणा, चालण्याची बोलण्याची वेगळी लकब .. असे काहीसे चित्र असते. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे या गोष्टी...