Tag: Rahul Gandhi

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने लोकांचा न्यायालयावरील विश्वास बळकट – चंद्रशेखर जाधव 
पिंपरी चिंचवड

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने लोकांचा न्यायालयावरील विश्वास बळकट – चंद्रशेखर जाधव

युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरीत फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२३ : सुप्रीम कोर्टाच्या राहुल गांधी यांच्यावरील निर्णयाने लोकांचा न्यायालयावरील विश्वास बळकट झाला आहे. असे प्रतिपादन युवक कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे. मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने कायम केलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. त्यावेळी चंद्रशेखर जाधव बोलत होते. याप्रसंगी प्रदेश सचिव गौरव चौधरी, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, कुंदन कसबे, विक्रांत सानप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, वसीम खान व इतर युवक कार्यकर्त...

Actions

Selected media actions