Tag: Right to Information Act

माहिती अधिकार कायद्याला विनम्र श्रद्धांजली – विश्वंभर चौधरी
विशेष लेख, मोठी बातमी

माहिती अधिकार कायद्याला विनम्र श्रद्धांजली – विश्वंभर चौधरी

विश्वंभर चौधरी थरारक सूडनाट्य. मुख्य माहिती आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालयाला माहिती देण्याचे फर्मावले म्हणून मोदी शहांनी त्यांचा सूड घेतला. मुख्य माहिती आयुक्तांसह राज्यातील सर्व माहिती आयुक्त काल संसदेत मंजूर झालेल्या सुधारणा कायद्यानुसार आता मोदी-शहांच्या थेट नियंत्रणात आले आहेत. कोणत्याही पदाला निर्धारित कालमर्यादा असते. माहिती आयुक्तांचा कार्यकाळ कायद्यानुसार पाच वर्षांचा आहे. मात्र, काल लोकसभेत पाशवी बहुमताचा गैरवापर करून मोदींनी हा कार्यकाल रद्द केला असून केंद्र सरकार आता वाट्टेल त्या वेळी आयुक्तांना दूर करू शकते. त्यांचे पगारही आता केंद्र सरकार ठरवेल. थोडक्यात काय तर मुख्य माहिती आयुक्तांसह सगळ्याच राज्यांचे माहिती आयुक्त आता मोदी शहांचे घरगडी झालेले आहेत. त्यांचा पगार तुमच्या करातून जाणार आहे. मात्र, त्यांच्यावर मालकी मोदी शहांची असणार आहे. या कायद्यात नियम करण्...