काळेवाडीत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडीतील रॉयल फाउंडेशन व काँग्रेसचे युवा कार्यकर्ते रवि नांगरे यांच्या वतीने सर्व वयोगटासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून त्यातील अनेकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर काहींची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. असे नांगरे यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना सांगितले.
या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, विश्वजित जगताप, माऊली मलशेट्टी, विजय ओव्हाळ, रॉयल फाउंडेशनचे सल्लागार प्रकाश नांगरे, रॉयल फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रकाश पठारे, कार्याध्यक्ष अजय काटे, ...