Tag: sandip rangole

वृक्ष संवर्धनासाठी हवी मानसिकता
विशेष लेख

वृक्ष संवर्धनासाठी हवी मानसिकता

संदीप रांगोळे, वृक्षप्रमी वृक्ष लावा, वृक्ष जगवा हे आवाहन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आपण नेहमीच एकतो आहे. त्यासाठी बेसुमार होणारी वृक्षतोड थांबली पाहिजे. नवीन वृक्ष लागवडीबरोबरच ती जगवायला हवी, याबाबात जनजागृती केली जाते. मात्र, ही जनजागृती व आवाहनांचा किती परिणाम झाला किंवा होतो आहे, हे पिंपरी चिंचवड शहरासह उपनगराच्या विविध भागात अव्याहतपणे होत असलेल्या वृक्षतोडीतून स्पष्ट होत आहे. पावसाळ्यात झाडे लावण्याचे कार्यक्रम पार पाडले जातात व त्या कार्यक्रमांचे फोटो माध्यमांमधून छापून आणले जातात. एकदा अशा कार्यक्रमांमधून फोटो छापून आले की, लावलेल्या झाडांचे काय झाले, ती जगली की नष्ट झाली, याकडे तेवढ्याच तत्परतने बघितले जात नाही. सध्या पिंपरी चिंचवड शहरात बांधकामांना अथवा रस्त्यांना अडथळा ठरणारी झाडे बेमुर्वतपणे तोडली जात आहेत. खासगी जागेतील झाडे तोड...