Tag: ST Employee

ग्राहक हक्क संघर्ष समितीचा एसटी कर्मचारी आंदोलनास पाठिंबा | दानशूरांनी एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटची मदत करण्याचे आवाहन
पिंपरी चिंचवड

ग्राहक हक्क संघर्ष समितीचा एसटी कर्मचारी आंदोलनास पाठिंबा | दानशूरांनी एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटची मदत करण्याचे आवाहन

पिंपरी : एसटी महामंडळ हे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्या मान्य करण्याकरीता राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यातीलच वल्लभनगर येथे सुरू असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनास ग्राहक हक्क संघर्ष समितीने पाठिंबा दिला आहे. त्या प्रसंगी ग्राहक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष अमोल उबाळे, रोहित नंदिरे, अजय कापुरे, योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, रितेश पायगुडे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी अमोल उबाळे म्हणाले की, "आत्ता पर्यंत ४१ एसटी कर्मचारी यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, हे गेंड्याच्या कातडीचे सरकार सुस्त झोपलेले आहे, ते जागे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ज्या पद्धतीने इतर राज्यात तेथील परिवहन व्यवस्था राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होऊन तेथील कर्मचारी यांना सर्व सुविधा पुरवितात. ...