Tag: Sumedha Kale

मावळ तालुका गुणवंत शिक्षका पुरस्काराने सुमेधा काळे सन्मानित
पुणे

मावळ तालुका गुणवंत शिक्षका पुरस्काराने सुमेधा काळे सन्मानित

पुणे : शिक्षण विभाग पंचायत समिती मावळ, सभापती, उपसभापती व सर्व पंचायत समिती सदस्य यांनी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यात तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शिरदे या गावात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सुमेधा काळे यांचा गुणवंत शिक्षका हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शिरदे हे मावळ तालुक्यातील अतिदुर्गम असे गाव असून सुमेधा काळे या मागील तीन वर्षांपासून तेथे ज्ञानदानाचे काम करत आहेत. तेथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी त्या सदोदित प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून पंचायत समिती मावळने त्यांना सन्मानित केले. माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसंगी भाजपा राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ...