शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं – डॉ. तारा भवाळकर
‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार २०२४’ च्या मानकरी डॉ. तारा भवाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणातील महत्त्वाचा संकलित अंश…
1) सांगलीमध्ये काही डॉक्टर, काही निरनिराळ्या क्षेत्रामधील मंडळी एकत्र येऊन आम्ही एक मासिक पत्रिका चालवतो. त्याच्यामध्ये जुन्या काळातलं चांगलं काय आणि ते ‘सायंटिफिक’ कसंय. आपल्याला वैज्ञानिक वगैरे असं म्हटलं की कळणं अवघड होतं. पण ‘सायंटिफिक’ म्हटलं की, अभिजात मराठीत पटकन कळतं. तर ते ‘सायंटिफिक’ कसंय हे सांगण्याचा प्रयत्न एक सद्गृहस्थ करत होते लेखनातून. आणि त्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलं होतं की, कुंकू लावणं हे कसं ‘सायंटिफिक’ आहे. आपण सुज्ञ आहात. मला काय म्हणायचंय ते आपल्या लक्षात येईल. कुंकू लावलं की… भ्रूमध्यामध्ये अमूक एक बिंदू कसा असतो आणि वैज्ञानिक दृष्टीने तो दाबबिंदू कसा असतो. त्यामुळे स्त्रियांचं मानसिक संतुलन वगैरे वगैरे कसं राहतं. माझं ड...