Tag: Vaibhav Ghuge

सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा युवा समाजसेवक ‘वैभव घुगे’
विशेष लेख, सामाजिक

सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा युवा समाजसेवक ‘वैभव घुगे’

राष्ट्रीय युवा दिन विशेष पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे राहणारा युवा समाजसेवक वैभव दिलीपराव घुगे यांचे मुळगाव वाशिम जिल्ह्यातील उडी (तालुका मालेगाव) हे आहे. वडील डॉ. दिलीपराव घुगे व्यवसायाने डॉक्टर व शेतकरी पण सामाजिक जान असल्यामुळे मिळेल, त्यामध्ये समाधानी होते. त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात चांगली माणसे कामवली. त्यांचे विचार आणि समाजहिताची कामे आजही ते नसतांना लोकांच्या मनात घर करून बसलेले आहेत. त्यांचाच वारसा घेऊन वैभव यांनी आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळेत करून ते अभियांत्रिकी (Mechanical Engineering) व व्यवसाय व्यवस्थापन (MBA) या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत खडतर परिस्थितीत स्वताला प्रत्येक वळणावर सिद्ध करत पुढे घेऊन जाणारा होता. अत्यंत दुर्गम परिस्थितीत शिक्षण पुर्ण करत व वडिल डॉ. दिलीपराव घुगे यांच्या सामाजिक विचारांनी प्रेरित होऊन...