आधुनिक इलेक्ट्रिकल साधनांमुळे पाटे-वरवंटे स्वयंपाक घरातून इतिहास जमा – प्रा. दिपक जाधव
चिंचवड : आजच्या काळात आधुनिक इलेक्ट्रिकल साधनांमुळे पाटे, वरवंटे स्वयंपाक घरातून इतिहास जमा होत आहेत. असे मत प्रा. दिपक जाधव यांनी येथे व्यक्त केले. येथील मुंबई-पुणे महामार्गालगत पाथरवट समाजातील कुटुंबाना विप्ला फाउंडेशनच्या शिक्षक दाम्पत्याने किराणा किट वाटप केले. त्यावेळी प्रा. जाधव बोलत होते.
संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण कदम, प्रकल्प प्रमुख जैद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रा. दिपक जाधव आणि प्रा. वैशाली गायकवाड या शिक्षक दाम्पत्याने छिन्नीने दगड फोडून वेगवेगळ्या स्वयंपाक घरातील पाटा, वरवंटा, खलबत्ता आदी साधने बनवणाऱ्या येथील पाथरवट समाजातील कुटुंबाना ४० किराणा किट वितरित केले.
प्रा. जाधव म्हणाले की, "शहरात गेली २० वर्षे पाथरवट समाज पाटा, वरवंटा टिकवण्यासाठी फुटपाथवर छिन्नी हातोडीच्या घाव टाकून साधने बनावत आहे. जनतेने स्वयंपाक घरामध्ये एखादा पाटा, वरवंटा खरेद...