पिंपरी : गांधीनगर येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हॉलमध्ये ज्ञानसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मानवता हिताय सोशल फाउंडेशनचा वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा महापुरुषांना वाचून साजरी करण्यात यावी, ह्या उद्देश्याने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने परीक्षा पॅड, वही व पेनाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलूवर वक्ते प्रदीप मस्के यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे समीर मसुळकर, सद्गुरू कदम, सोनाली तुषार हिंगे, माधवी शिंदे, अश्विनी महावीर कांबळे, सोनाली दळवी आदी मान्यवरांनी हजेरी लावली.
त्यावेळी मानवता हिताय संस्थेचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल वाली, नवनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष नितुल पवार, निलेश लोंढे, विजय शिंगाडे, प्रकाश गवई व अमोल बेंद्रे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तानाजी साठे यांनी केले.