तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की खून?

तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की खून?

जेट जगदीश

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंग व किर्तनातून समाजाची जनजागृती करायचे. त्यांनी पुराणातील खोट्या कर्मकांडावर प्रचंड प्रमाणात टिका केली. अनिष्ट चालीरीती रुढी परंपरेला विरोध केला. अंधश्रद्धा निर्मूलन केले. तुकाराम महाराजांच्या किर्तनातून गावोगावी सुधारणा होऊ लागली. वर्णभेद, जातीभेद कमी होऊ लागला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या किर्तनातून नुसते जन जागृतीच करत नव्हते तर ते आपल्या किर्तनातून तयार झालेल्या युवकांना स्वराज्यासाठी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती करत होते. शिवाजी महाराजांचे मावळे घडवत होते. त्यांना आर्थिक मदत पुरवत होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात गुरु-शिष्याचे नाते तयार झाले होते. त्यामुळे भटांचे मनुवाद्यांचे लोकमनातील वर्चस्व कमी होत चालले होते. लोक अंधश्रद्धेतून बाहेर पडू लागले होती. या गोष्टीचा भटांना जास्तच त्रास झाला. परिणामी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज भटांना नकोसे वाटू लागले. म्हणून त्यांनी धुळवडीच्या खेळाचा गैरफायदा घेतला. रामेश्वर भट, मंबाजी भट, सालोमालो या तिघांनी मिळून धुळवडीच्या दिवशी 1650 मध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा निर्घृण खून केला. त्यांच्या मृत शरीराची विल्हेवाट लावून टाकली. आपण केलेल्या खूनाची माहीती जर लोकांना समजली तर ते आपल्याला मारून टाकतील. या भितीने आपला गुन्हा लपविण्यासाठी या भटांनी धुळवडीच्या दुसर्‍या दिवशी तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याचा बनाव रचला. महाराज पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठाला जाताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहीले. असे खोटेनाटे सांगून आपला खून पचवला. लोकांची दिशाभूल करुन बीज नावाचा नवीन सण सुरू केला. आपल्या संतांचा खून या नतद्रष्ट भटांनीच केला. ज्या ज्या वेळी असे खून झाले त्या त्या वेळी भटांनी आपल्याला नव-नवीन सण दिले आणि आपण ते आनंदात साजरे करतोय; यापेक्षा दुर्दैव ते कोणते?

माणसं मारून विचार कधीच मरत नाहीत. जो गाथा वाचेल तो तुम्हांला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सत्य हे सर्वांना समजणारच. प्रस्थापित परंपरेमध्ये धर्म सांगण्याचा अधिकार हा उच्चवर्णीयांकडे भटाकडे होता. तुकोबांनी त्यांना आव्हान दिलं आणि धर्म सांगण्याचा अधिकार आपल्या हातात घेतला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा।
येरांनी वाहावा भार माथां।
तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं।
तुम्ही गुरुभक्ती नका सांगू॥

बहिणाबाई सांगतात, बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला।
द्वेषही मांडिला तेच क्षणीं॥
यात मंबाजी, तुकाराम महाराज हे ब्राह्मण नाहीत म्हणून त्यांना स्वतःच्या पंक्तीत बसत नसल्याचे सांगून गुरुभक्ती बाबत त्यांनी बोलू नये असं म्हटलं आहे. म्हणजे भेदाभेद, वर्चस्ववाद या जोरावर ज्ञान संपादन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता हे समजतं. एवढंच नाही तर सत्य प्रबोधनातून जनसामान्यांपर्यंत पोचवणे आणि त्यांना जागृत करणे हा अक्षम्य गुन्हा समजला जात होता. तरी तुकाराम महाराज ठामपणे सत्यशोधक विज्ञानवादी बंडखोर विद्रोही भूमिकेतून बहुजन आणि मराठा जनतेसमोर सत्य मांडत राहिले. हे विचार मूळ धरत होते जे या मंबाजी सारख्या मनुवादी ब्राह्मणवादी लोकांना न पचणारं होतं…!

बहिणाबाई पुढे सांगतात, हे सर्व काही मंबाजीने द्वेषातून दाखवून दिले होते. ज्यांना ज्यांना वाटतं की, तुकाराम महाराज यांना खरचं पुष्पक विमान वैकुंठाला घेवून जाण्यास आलं होतं, तर हे शक्य आहे का? असा साधा प्रश्न स्वतःला विचारून बघावा. उगाच नको त्या अफवांना देवभोळी भक्ती या नावाखाली अजून किती वर्ष मूर्ख बनणार आहात? आजही मनुवाद्यांना विरोध दर्शवणारे दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्यासारखे मानवहीत जोपासणारे विज्ञानवादी परिवर्तनवादी सत्यशोधक, निर्भीड मत मांडणारे लोक मारले जातात. म्हणजेच पुष्पक विमानात बसून तेही वैकुंठाला जातात असे म्हणायला मनुवाद्यांनी मागेपुढे पाहिले नसते. आज जर सत्य पोचवणारी माध्यमे नसती तर यांच्या बाबतही असंच काही खोटंनाटं पसरवलं असतं आणि आपण ते मान्य केलं असतं. अगदी हेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बाबत घडलं. तुकाराम महाराज यांचे विचार मनुवादी लोकांना न पटणारे होते.

मला माहीत आहे हा विषय वादग्रस्त आहे. मला याचीही पूर्णत: जाणीव आहे की या घटनेची चिकित्सा करणे वारकरी संप्रदायालाही मान्य करत नाही. संतश्रेष्ठ तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले. त्यांना नेण्यासाठी वैकुंठगमन झाले. त्यांना नेण्यासाठी वैकुंठाहून गरूडध्वजधारी विमान आले. त्यात बसून त्यांचे वैकुंठी निर्गमन झाले अशी सर्वांची श्रद्धा आहे. गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रातील मराठी माणूस या भाकडकथेवर डोळे झाकून विश्‍वास ठेवत आहे.