जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त महापालिकेतर्फे संत तुकोबाराय यांना अभिवादन

जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त महापालिकेतर्फे संत तुकोबाराय यांना अभिवादन

पिंपरी, दि.२० मार्च २०२२ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत तुकोबाराय यांना अभिवादन करण्यात आले. संत तुकाराम महाराज यांच्या पिंपरी मधील संत तुकारामनगर येथील पुतळ्यास तसेच निगडी येथील भक्ती शक्ती समुह शिल्पास महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त महापालिकेतर्फे संत तुकोबाराय यांना अभिवादन

पिंपरी येथील कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसदस्य जितेंद्र ननावरे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती मायला खत्री, जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र बहल, वसंत शेवडे, नंदू कदम, माधुरी आंबेकर, वर्षा जगताप, माणिक अहिरराव, हरिभाऊ करमाळकर, सुभाष कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

निगडीतील भक्ती शक्ती येथील कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, अ क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, कार्यकारी अभियंता प्रविण घोडे, जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते जीवन बोराडे, सागर तापकीर आदी उपस्थित होते.