धामणे कुटूंबाकडून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास ११००० रूपयांची मदत

धामणे कुटूंबाकडून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास ११००० रूपयांची मदत

सारोळा कासार : आदर्श गाव सारोळा कासार मधील कै. जयवंतराव गणपतराव धामणे (दादा) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त धामणे परिवारास दादांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक फणसाचे झाड देण्यात आले.

यावेळी धामणे कुटुंबियांनी गावामध्ये एक नवा पायंडा पाडत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या भव्य इमारतीच्या बांधकामासाठी ११,००० रुपये तर गावातील चालू असलेली वृक्षचळवळीस १,१०० रुपये आर्थिक मदत केली. त्याबद्दल गावच्या वतीने धामणे परिवाराचे आभार मानण्यात आले. तसेच दादांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.