पिंपरी : शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची बैठक मंगळवारी (ता. १९) आकुर्डी येथील श्रमशक्ति भवन येथे पार पडली. या बैठकीत पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतलेल्या समाजविरोधी धोरणावर चर्चा करण्यात आली. पुढील व्यापक आंदोलनाची दिशा ठरविण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव राजेश ढावरे, सचिव सुरेश गायकवाड, कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे, प्रकाश जाधव, प्रदीप पवार, भाऊसाहेब आडागळे, आनंदा कुदळे, अपना वतन संघटनेचे हमिद शेख, राजश्री शिरवळकर, मानव अधिकारचे फतिमा अंसारी, शिवशाही व्यापारी महासंघाचे युवराज दाखले, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, संजय जाधव, दीपक खैरनार, मराठा क्रांति मोर्चाचे जीवन बोराडे, शिव जयंती उत्सव समितीचे सागर तापकीर, अभिषेक म्हसे, राजेंद्र महाले, धनाजी येक्कर पाटील, गिरीश वाघमारे, स्वदीप अडसूळ, शहादेव कसबे, आकाश शिदे, आयटकचे अनिल रोहम, उमेश धर्मव्ते, सचिन एम. आर. , गणेश दरडे, धनंजय कांबळे, के. डी. वाघमारे आदी उपस्थित होते.
दरम्यान, महानगरपालिकेची एकूण ८ रुग्णालये आणि २९ दवाखान्यांमधून औषधोपचारांचे दर शासन दराने म्हणजे दुप्पट दराने आकारण्याचा निर्णय महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे. तसेच महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा चालू होऊन देखील आज पावेतो शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आलेले नाही. आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा व विचार विनिमय करून एक व्यापक आंदोलन करण्याबाबत व पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अशी माहिती शिवशाही व्यापारी महासंघाचे युवराज दाखले यांनी दिली.