पिंपरी चिंचवड : महिला कॉंग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली किरण नढे व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सन्मान नारीशक्तीचा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी ज्येष्ठ नेत्या माजी नगरसेविका निगारताई बारस्कर, आशा भोसले, निर्मला खैरे, स्वाती शिंदे, सिमा हलकट्टी, रंजना सौदेकर, सारीका पुरोहित, मयुरी कांबळे उपस्थित होत्या.
पोलीस कर्मचारी, डॉक्टर, शिक्षिका, कंडक्टर व ड्रायव्हर महिला, सफाई महिला कर्मचारी, ॲडव्होकेट्स महिला, बँक कर्मचारी, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या, पोस्ट ऑफिस कर्मचारी महिला आदींचा या पुरस्कारार्थीमध्ये समावेश आहे.