विजयकुमार सूर्यवंशी
भारतरत्न पुरस्कार मिळणेचे निकष, नियम अटी – जो सरकारचे पैसे खर्च न करता भारताचे नाव जगात मोठे करील त्यांन हा पुरस्कार मिळाला पाहीजे. जे जगातील कोणालाच करता आले नाही, ते अण्णा भाऊ साठे यांनी केले म्हणजेच डंकर्क, हिरोशिमावर अण्णा भाऊ साठे यांनी काव्य केले ते इतरांना जमले नाही. स्टॅलीनग्रीडवर अण्णा भाऊंनी पोवाडा रचला-गायला. अण्णा भाऊ साठे यांना जागतीक साहित्यपरीषदचे निमंत्रण पॅरीसहून आले होते. अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा रशियात बसवला जात आहे आणि या कार्यक्रमाला जगातील अनेक विचारवंत येणार आहेत या मुळे भारताचे नाव जगात मोठे होणार आहे म्हणून दोन्हु सभागृहानी अभिनंदन ठराव संमत केला तो ठराव केंद्रसरकारला तात्काळ पाठवला पाहीजे.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगातील २७ वीस भाषेत भाषांतरीत झाले आहे त्या मुळे अगोदरच भारताचे नाव अण्णा भाऊ साठे यांचे मुळे मोठे झाले आहे. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून विधानसभा अध्यक्ष,मंत्री, खासदार, आमदार यांनी पत्र/ निवेदन दिले आहेत हे यांचे निवेदन निवेदन म्हणजे जनाधार, जनमत असते. या जनाधाराची दखल केंद्र सरकारला घ्यावीच लागते असे निकष,नियम आहेत.