खुशखबर ! पेट्रोल-डिझेलच्या दरात कमालीची घट, जाणून घ्या आजचे दर
नवी दिल्ली : लोकमराठी – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे. याचा परिणाम स्थानिक बाजारात दिसून येत आहे. देशात लागोपाठ पेट्रोल-डीझेलचे दर घटत आहेत. मंगळवारीसुद्धा पेट्रोल आणि डीझेलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोलच्या दरात 11-12 पैसे कपात केली. तर डीझेल 13-14 पैसे प्रती लीटर स्वस्त झाले आहे. या कपातीनंतर दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी 73.60 रुपये मोजावे लागतील. तर एक लीटर डीझेलसाठी 66.58 रुपये खर्च करावे लागतील.
चार महानगरांमध्ये पेट्रोल-डीझेलचे दर
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर अनुक्रमे 73.60 रुपये, 79.21 रुपये, 76.22 रुपये आणि 76.44 रुपये प्रती लीटर आहेत. तर चार महानगरांमध्ये डीझेलचे दर अनुक्रमे 66.58 रुपये, 69.79 रुपये, 68.94 रुपये आणि 70.33 रुपये प्रती लीटर किमतीने मिळत आहे. 3 महीन्यातील खालच्या पातळीवर कच्चे तेल
चीनमध्ये घातक कोरोना वायरसच्या संसर्गामुळे मागणी घटल्याने कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत.सोमवारी कच्च्या तेलाच्या दराने 3 महीन्यातील सर्वात खालची पातळी गाठली होती. कोरोना वायरसच्या प्रकोपामुळे आगामी दिवसात पेट्रोल-डीझेलचे दर आणखी घसरू शकतात. मागणी कमी झाल्याने दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड 0.30 टक्क्यांवरून 59.14 डॉलर प्रती बॅरल झाले आहे.