तळेगाव दाभाडे (लोकमराठी) : दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. दिव्यांग बांधवांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन मिळवून द्यायचे असेल तर लोकप्रतिनिधींनी शासनामार्फत सहकार्य केले पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे.कर्तव्य व सेवाभावनेतुन त्यांच्याकडे समाजातील प्रत्येकाने पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले. आज विश्व दिव्यांग दिनानिमीत्ताने आ. शेळके यांनी दिव्यांगांसोबत कार्ला येथे केक कापून दिव्यांग दिन साजरा केला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जि. प. सदस्य बाबुराव आप्पा वारकर, मा. प. समितीचे सदस्य दिपक हुलावळे, रा. काॅ. युवक अध्यक्ष सचिनभाऊ घोटकुले, रा. काॅ. सरचिटणीस सुदाम कदम, रा. कॉ. लोणावळा शहर अध्यक्ष जीवन गायकवाड. राजु देवकर मा.सरपंच दिव्यांग बांधव उपस्थित होते
दरम्यान, आमदार सुनिल शेळके यांनी दिव्यांग व्यक्तींना सर्वपरीने सहकार्य करून सक्षम करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.